सरकार लाँच करणार नवीन गॅरेंटेड किमान परतावा देणारी पेंशन योजना

सरकार लवकरच किमान परतावा देणारी पेंशन योजना सादर करण्याची शक्यता आहे. पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए) अध्यक्ष सुप्रतिम बंदोपाध्याय म्हणाले की, पीएफआरडीए किमान परतावा गॅरेंटी देणारी पेंशन योजना सादर करण्याच्या तयारीत आहोत. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

याच आर्थिक वर्षात लाँच होणार योजना –

पेंशन फंड योजनेंतर्गत व्यवस्थापित निधीला मार्केट-टू-मार्केट केले जाते. त्यामुळे बाजारातील उतार-चढावाचा यावर परिणाम होतो. बंदोपाध्याय म्हणाले की, यामुळे काही लोक असे असू शकतात, ज्यांना किमान सुनिश्चित परतावा हवा असेल. त्यामुळे आम्ही आमच्या पेंशन फंड व्यवस्थापक आणि काही कंपन्यांसोबत किमान गॅरेंटीचा उत्तम स्तर काय असावा, याबाबत चर्चा करत आहोत.

गॅरेंटीसह मिळणार परतावा –

बंदोपाध्याय म्हणाले की, पेंशन अथॉरिटी याबाबत पेंशन फंड आणि एक्चुरियल फर्मससोबत चर्चा करत आहे. ही अशी पेंशन योजना असेल, ज्यात कमी मात्र निश्चित परतावा देण्यात येईल. ज्याप्रमाणे बँकेचे एफडी किंवा अन्य फिक्स्ड रिटर्न देणारे साधन आहे. अशाचप्रकारची योजना पीएफआरडीए आणण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, सध्या पीएफआरडीएच्या राष्ट्रीय पेंशन योजना आणि अटल पेंशन योजना आहेत.