भारतीय सैन्याच्या बहादुरी, पराक्रमाची जेव्हा चर्चा होते त्यावेळी गोरखा रेजिमेंटची नाव नक्की येते. गोरखा हॅटमध्ये दिसणारी गोरखा रेजिमेंट आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. देशाचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांना देखील गोरखा हॅट विशेष आवडते. हिमाचल प्रदेशच्या सुबाथू येथे बनणारी ही विशेष हॅट लष्करप्रमुख असताना बिपिन रावत घालत असे.
जनरल बिपिन रावत घालतात या ठिकाणी बनलेली विशेष गोरखा हॅट
सुबाथूचे कारागीर अशोक थापा हे ही विशेष हॅट बनवतात. माजी लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सोहाग यांना देखील ही हॅट आवडत असे. अशोक थापा यांनी सांगितले की, 25 वर्षांपासून ते रेजिमेंटसाठी गोरखा हॅट बनवत आहे. जनरल रावत यांच्याशी कधी थेट संपर्क आला नाही. मात्र 14 जीटीसीच्या सैन्य अधिकाऱ्यांद्वारे जनरल रावत यांच्यासाठी गोरखा हॅट बनविण्याची संधी मिळाली.
ही हॅट बनविण्यासाठी थापा यांना 4 दिवस लागले. त्यांनी सांगितले की, सुबाथू 14 जीटीसीमध्ये वन जीआर आणि 4 जीआरच्या सैनिकांसाठी गोरखा हॅट तयार केली जाते. या दोन्ही रेजिमेंटची ओळख गोरखा हॅटवर लावलेल्या पट्टीद्वारे होते. सैन्यातील वरिष्ठ रँकच्या आधारावर हॅटवर पट्टी लावली जाते. यंदा देखील जनरल रँकसाठी हॅट तयार केली जात असून, याची कधीही ऑर्डर मिळू शकते.
दुसरीकडे सैन्याच्या सुविधा केंद्रात गोरखा हॅट बनवणारे जनकराज यांनी सांगितले की, ते मागील 10 वर्षांपासून गोरखा रेजिमेंटच्या वन जीआर आणि फोर जीआरसाठी गोरखा हॅट बनवत आहेत.