लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोनाच्या नावाखाली लोक फसवणूक करत आहे. प्लाझ्मा, पीपीई किट, कोरोना चाचणी या आधारावर खोटे बोलून लोकांच्या फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. हॅकर्स लोकांना मोफत कोरोना चाचणी करण्यासाठी ई-मेल पाठवत आहेत.
सावधान! मोफत कोरोना चाचणीच्या नावाखाली अशा प्रकारे होत आहे फसवणूक
ठग लोकांना मोफत चाचणी करण्यासाठी एक ईमेल पाठवत आहेत. या ईमेलचा अॅड्रेस काहीसा सरकारी ईमेलशी मिळता जुळता असतो. ई-मेलमध्ये एक लिंक देखील पाठवतात. लिंकवर क्लिक करताच नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर अशी खाजगी माहिती मागितली जाते. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 20 रुपये मागितले जातात.
यानंतर व्हॉट्सअॅप नंबरवर एक क्यूआर कोड पाठवला जातो. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे उडवले जातात. अशा प्रकरणात सावध राहण्याची गरज आहे. सरकार कोरोनाच्या चाचणीसाठी कोणताही ईमेल पाठवत नाही हे लक्षात ठेवा. आधी हॅकर्स ओटीपीची मागणी करून फसवणूक करत असे. मात्र आता क्यूआर कोडचा वापर करत आहेत.
जर तुम्हाला कोणी क्यूआर कोड पाठवला व यूपीआय अॅपद्वारे स्कॅन करण्यास सांगितल्यास अशी चूक करू नका. कारण स्कॅन करताच खात्यातून पैसे गायब होतात व याची जबाबदारी तुमची असते.