‘किंमत मोजावी लागेल’, मुजोर चीनने आता या छोट्या देशाला धमकावले

चीन सध्या कोरोना व्हायरस महामारी, ट्रेड वॉर आणि आपल्या साम्राज्यवादी भूमिकेमुळे जगभरातील देशांच्या निशाण्यावर आहे. अनेक देशांसोबत तणावाचे संबंध निर्माण करणारा चीन आता छोट्या देशांना देखील धमकावत आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीने यूरोपियन देश चेक गणराज्यला धमकावत, तायवानसोबतच्या मैत्रीची किंमत मोजावी लागेल असे म्हटले आहे.

वांग यीने चेक गणराज्यच्या अधिकाऱ्यांच्या तायवान यात्रेला भडकाऊ आणि अदूरदर्शी पाऊल असल्याचे म्हटले आहे. जो कोणी एक चीन या धोरणाला आव्हान देईल, त्याला किंमत चुकवावी लागेल. चेक गणराज्यने आपल्या अधिकाऱ्यांना तायवानला पाठवले होते, त्यामुळे भडकलेल्या चीनने ही प्रतिक्रिया दिली.  

अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स अजार यांनी देखील तायवानचा दौरा केल्याने चीन दबावाखाली आला आहे. एलेक्स हे 41 वर्षानंतर तायवानचा दौरा करणारे पहिले अमेरिकेचे मोठे नेते आहेत. चीन तायवानला आपला भाग मानतो. एलेक्स अजार यांच्यानंतर चेक गणराज्यचे सीनेट अध्यक्ष मिलोस वीसट्रिसिल चीनच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करत तायवानला पोहचले. त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामुळे चीन चांगलाच भडकला आहे.

वांग चेकचे सीनेट अध्यक्षांचा तायवान दौऱ्यावर निशाणा साधत म्हणाले की, एक चीन धोरणाला आव्हान देणाऱ्या प्रत्येकाला मोठी किंमत मोजावी लागेल. तायवान चीनचा अविभाज्य भाग आहे आणि तायवान मुद्यावर चीनच्या धोरणाला आव्हान देणे हे 1.4 अब्ज चीनी नागरिकांना शत्रू बनवण्यासारखे आहे.