LAC वर पुन्हा तणाव; भारतासाठी यामुळे महत्त्वाचे आहे पेंगोंग लेक

भारत आणि चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा पुर्व लडाख भागात झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये ही झडप पेंगोंग त्सो झीलच्या किनाऱ्यावर झाली. सरकारने माहिती देत सांगितले की, 29-30 ऑगस्टच्या रात्री भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पेनगोंग त्सो लेक 1962 च्या भारत-चीन युद्धात देखील कारण ठरले होते. या तलावामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याद्वारे सतत पेट्रोलिंग केली जाते.

का महत्त्वपुर्ण आहे पेंगोंग लेक –

  • पेंगोंग लेक लडाखमध्ये भारत-चीन सीमा क्षेत्रात आहे. हा लेक 4350 मीटर उंचीवर स्थित 134 किमी लांब आहे. पेंगोंग लेक लडाखपासून तिबेटपर्यंत पसरलेला आहे.
  • या लेकचे 45 किमी क्षेत्र भारतात तर 90 किमी क्षेत्र चीनमध्ये येते. एलएसी या लेकच्या मध्यभागातून जाते.
  • या लेकचे पाणी खारे असल्याने यात मासे किंवा इतर कोणतेही जीव नसतात. मात्र अनेक प्रवासी पक्षांसाठी हे महत्त्वपुर्ण प्रजनन स्थान आहे.
  • 19व्या शतकाच्या मध्यात हा लेक जॉन्सन रेषेच्या दक्षिणेकडील टोकाला होता. जॉन्सन लाइन हा भारत आणि चीनला अक्साई चीन प्रदेशात सीमा निश्चित करण्याचा प्रारंभिक प्रयत्न होता.
  • या भागात खर्नाक किल्ला आहे, जो लेकच्या उत्तर किनाऱ्यावर आहे. हा किल्ला आता चीनच्या नियंत्रणात असून, 1962 च्या युद्धात चीनी सैन्याने येथे कारवाई केली होती.
  • पूर्वेकडे श्याक नदी (सिंधू नदीची उपनदी) या लेकमधून उगम पावते, परंतु नैसर्गिक धरणामुळे ती थांबली आहे.
  • या लेकचा प्रवास करण्यासाठी इनर लाइन परमिटची आवश्यकता असते. कारण पेंगोंग लेक एलएसीवर आहे.
  • भारतीय नागरिक वैयक्तिक परमिट घेऊ शकतात, इतरांकडे मान्यताप्राप्त मार्गदर्शकासह ग्रुप परमिट (कमीतकमी तीन व्यक्तींसह) असणे आवश्यक आहे.
  • लेहमधील पर्यटन कार्यालय हे परवानगी देते. सुरक्षेच्या कारणास्तव भारत या लेकमध्ये होडीमधून जाण्यास परवानगी देत ​​नाही.