अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण


कोरोना या दुष्ट संकटाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असून या व्हायरसने सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता मराठमोळा अभिनेता सुबोध भावेचे घर देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. या दुष्ट व्हायरसची लागण सुबोधसह त्याची पत्नी आणि मोठ्या मुलाला देखील झाली आहे. यासंदर्भातील माहिती सुबोधने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारांटाइन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ.च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया’, अशी पोस्ट सुबोधने शेअर केली आहे.