तुकाराम मुंढेंचे फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना आवाहन


मुंबई – शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अशी ओळख असलेले त्याचबरोबर आपल्या धडाकेबाज कामगिरी आणि सतत होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांच्या सेवेतील ही १५ वी बदली झाली असून तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई, नाशिक आणि आता नाशिकपाठोपाठ नागपूर येथे पालिका लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या विरोधामुळे बदली करण्यात आली आहे.

फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी खास आवाहन केलं आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, माझा कोरोना रिपोर्ट कोणतीही लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आला आहे. सरकारच्या सर्व नियम आणि अटींचे मी पालन करत होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करत आहे. होम क्वारंटाइनच्या दिशानिर्देशांचे तुम्हीही पालन करावे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. आपल्या फेसबुक पोस्टची सुरुवात आणि शेवट मुंढे यांनी ऑल इज वेल असे लिहून केली. यातून त्यांनी सर्व काही ठिक असल्याचा संदेश दिला आहे.

तुकाराम मुंढे यांनी गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. कोणतीही लक्षणे नाहीत पण नियमांप्रमाणे होम क्वारंटाइन राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी आता फेसबुकपोस्टद्वारे जनतेला आवाहन केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत, पण ते पॉझिटीव्ह आले आहेत, अशा सर्वांनी होम क्वारंटाइनच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो, असेही तुकाराम मुंढे यांनी नमूद केले.

तुकाराम मुंढे यांची फेसबुक पोस्ट

All is Well…!मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे…

Posted by Tukaram Mundhe on Saturday, 29 August 2020