कोरोना प्रतिबंधक लसीनंतर रशियाने तयार केले हवेतून होणाऱ्या प्रादुर्भावाला रोखणारे अनोखे मशिन


मॉस्को – मागील पाच महिन्यांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे दुष्ट संकट घोंघावत आहे. त्यातच अनेक देशातील संशोधक या कोरोनाचा मूळपासून नायनाट करणारे औषध शोधण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. हवेच्या माध्यमातून संक्रमित करणाऱ्या विषाणूंचा शोध घेणे अशा काळात खूप कठीण काम आहे. अशाच हवेतील बॅक्टेरिया, व्हायरसला डिटेक्ट करणारे एक मशिन आता रशियन तज्ज्ञांनी तयार केले आहे. हवेद्वारे पसरत असलेल्या व्हायरसबाबत या मशिनद्वारे काही सेकंदात माहिती मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर या मशीनच्या माध्यमातून व्हायरसच्या प्रादुर्भावाचा स्त्रोतही कळू शकतो.

मॉस्कोच्या सैन्य औद्योगिक मंच 2020 मध्ये शुक्रवारी केमिस्ट्री बायो नावाचे उपकरण सादर करण्यात आले. KMZ फॅक्ट्रीद्वारे हे मशिन तयार करण्यात आले असून गमालेया इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीचा भाग असून ही तिच कंपनी आहे, ज्यांनी जगातील पहिली प्रतिबंधक कोरोना लस बनवल्याचा दावा केला होता. याच रशियन कंपनीतील तज्ज्ञ हे मशिन तयार करत आहेत. कोणत्याही मशिनप्रमाणे डिटेक्टर बायो पॉकेट दिसत नसून रिफ्रेजरेटर प्रमाणे दिसते. लेअर केक डिजाईनमध्ये याचा आकार तयार करण्यात आला असून या मशिनच्या प्रत्येक लेअरमधून तपासणी केली जाते.

हवेत प्रसारित होत असलेल्या व्हायरसची माहिती या मल्टीपल लेअर्स मशीनच्या माध्यमातून मिळू शकते. या मशिनबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दोन टप्प्यातील चाचणी प्रक्रियेतून योग्य परिणाम दिसून येण्यासाठी जावे लागते. पहिल्या टप्प्यात आजूबाजूच्या हवेतील नमुने एकत्र केले जातात. व्हायरस, बॅक्टेरिया आणि विषारी बॅक्टेरियांना अवघ्या 10 ते 15 सेकंदात डिटेक्ट केले जाते. त्यानंतर विस्तृत विश्लेषण केले जाते. 2 तासांचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागतो. जगभरातील गर्दीच्या ठिकाणी हे मशिन वापरात असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या मशिनचा वापर मेट्रो, रेल्वे स्टेशन, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी केला जाऊ शकतो.