‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटाला संपूर्ण देश मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. त्यामुळे मोदी सरकारने या संधीचा उपयोग करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 68 व्या भागात लहान मुलांच्या खेळण्यांच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्यासाठी खेळण्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. खेळण्यांचा उद्योग खूप व्यापक आहे. परंपरा, क्रिएटीव्हीटी आणि युवा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने खेळण्याच्या बाजारपेठेत आपले योगदान वाढवले पाहिजे, असे उल्लेख त्यांनी आग्रहाने केला. यासाठी त्यांनी तरुणाईला खेळणी बनवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत टॉय सेक्टरमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

आपल्या देशाला स्थानिक खेळण्यांची फार मोठी परंपरा आहे. त्याचबरोबर आपल्या देशात सुरेख खेळणी बनवणारे खूप कौशल्य कारागिर आहेत. आपल्या देशातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये खेळण्यांचे चांगले उत्पादन होते. अशी खेळणी निर्मिती करणारी केंद्र निर्माण करण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले.

मोदी कम्प्युटर गेम आणि अॅप बनवण्यावर जोर देत असे म्हणाले की, लोकांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा वापर करावा. यासाठी KOO नावाचा एक अॅप आहे. ज्यामध्ये तुम्ही आपल्या मातृभाषेत टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारे आपले म्हणणे मांडू शकता. तसेच इतरांशी संवाद साधू शकता. त्याचप्रमाणे चिंगारी नावाचा अॅप देखील तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहे. Ask Sarkar नावाच्या नवीन अॅपमध्ये सरकारी योजनांबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता.

सणांचा उत्साह कोरोना संकटाळात असला तरी त्यांच्यावर निर्बंध देखील कायम आहे. जनतेने धार्मिक कार्यक्रमात संयम दाखवला. तसेच ऑनलाईन, इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ओनम निमित्त त्यांनी अन्नदाता शेतकऱ्यांना नमन केले. खरीप पिक उत्पादनांत 7% वाढ झाल्याचेही त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले. दरम्यान मन की बात या कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. विशेष करुन आज त्यांनी लहान मुले, त्यांची खेळणी, खेळ आणि त्यातून त्यांचा होणारा मानसिक-शारीरिक विकास यावर भाष्य केले.