विरुष्काला शुभेच्छा देणे करण जोहरला पडले महागात, झाला ट्रोल


भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्याने याची माहिती देणारी एक पोस्ट करत त्याला ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन दिले होती. विराटच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. पण त्यांना शुभेच्छा देणे बॉलिवूडचा डॅडी अर्थात निर्माता, दिग्दर्शक करण जोहरला महागात पडले आहे. त्याला त्याने केलेल्या कमेंटमुळे ट्रोल करण्याता आले आहे.

विरुष्काच्या पोस्टवर करण जोहरने ‘प्रेम प्रेम आणि खूप जास्त प्रेम’ या आशयाची कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटवर अनेकांनी त्याला उत्तर देत ट्रोल करण्यास सुरुवात केली. करण जोहर अनुष्का आणि विराटच्या मुलाची वाट बघत आहे. कारण त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे असल्याचे एका युजरने असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने या स्टारकिडला लाँच करण्यासाठी तू प्लॅन करत आहेस? स्टुडंट ऑफ द इअर ४२० असे म्हणत ट्रोल केले आहे.

बॉलिवूडमधील घराणेशाही हा वाद अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पेटून उठला. अनेक स्टारकिड्स आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना सुशांतच्या चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. विशेष करुन नेपोटीझम प्रमोटर म्हणून करण जोहरला ट्रोल करण्यात आले. ट्रोलिंगला कंटाळून करणने त्याचा कमेंट बॉक्स प्रायव्हेट केला होता. तसेच सोशल मीडियापासूनही तो काही काळांपासून लांब होता. आता पुन्हा करण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच विरुष्काच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे करणला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे.