प्रेमात अडकून मुलींचे धर्मांतरण करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, योगी आदित्यनाथांनी दिले आदेश

उत्तर प्रदेश सरकारने मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाटी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदित्यनाथ म्हणाले की, ओळख लपवून, प्रेमाने अथवा ब्लॅकमेल करून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. महिलांचे उत्पीडन आणि त्यांच्यासोबत घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत.

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आदित्यनाथ यांनी मागील काही दिवसात घडलेल्या महिलांसोबतच्या हिंसाचाराच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली. अनेक जिल्ह्यातील मुलांनी धोक्याने प्रेमात अडकवण्यात आलेल्या घटनांची देखील त्यांनी समीक्षा केली. या घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्री आराखडा तयार करण्यास सांगितला आहे.