टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी माहिती दिली की त्यांच्या ब्रेन-कॉम्प्युटर कंपनी न्यूरोलिंकने एका नाण्याच्या आकाराच्या चिपला डुक्कराच्या मेंदूमध्ये इंस्टॉल केले आहे. मस्क यांचा दावा आहे की, एकदा पुर्णपणे हे डेव्हलप झाल्यानंतर न्यूरोलॉजिकल कंडिशन असणाऱ्या असणाऱ्या लोकांसाठी उपयोगी ठरेल आणि स्मार्टफोन्स कंट्रोल करण्यासारख्या कामात याचा वापर होईल.
मस्क यांनी सादर केली मेंदूत इंस्टॉल करता येणारी चिप, या आजारांवर ठरणार परिणामकारक
न्यूरोलिंक इव्हेंटचे यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. या दरम्यान तीन डुक्करांना दाखवण्यात आले. यातील एका डुक्कराच्य मेंदूत दोन महिन्यांपुर्वी चिप इंस्टॉल करण्यात आली होती. मस्क यांनी डुक्कराला सादर करत म्हटले की, हा एक निरोगी डुक्कर आहे. यात दोन महिन्यांसाठी चिप इंस्टॉल करण्यात आली होती. यावेळी त्यांनी डुक्कराची रियल टाइम ब्रेन एक्टिव्हिटी देखील दाखवली.
मस्क यांनी यावेळी सांगितले की, हे डिव्हाईस रिमूव्हेबल आहे. रोबॉट्सद्वारे 1 तासांपेक्षा कमी वेळेत ही चिप मेंदूत इंस्टॉल करता येते. सोबतच सहज काढता येते.
या डिव्हाईसचा मुख्य उद्देश अशा लोकांची मदत करणे आहे जे एडिक्शन, स्ट्रॉक्स आणि मेमरी लॉस सारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांचा सामना करत आहेत. हे डिव्हाईस यूजरच्या हेल्थला मॉनिटर करेल आणि काहीही संशयास्पद आढळल्यास सूचना देईल.