सरकारने जारी केली सूचना, बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

देशभरात बँकेशी संबंधित फ्रॉड आणि फिशिंग ईमेलचे प्रकार वाढले आहेत. फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे पाहून सरकारने बँक ग्राहकांसाठी एक सूचना जारी केली असून, यात ग्राहकांना संशयास्पद ईमेलपासून स्वतःला लांब ठेवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटी अवेयरनेस ट्विटर हँडलद्वारे नागरिकांना बँकिंगसाठी दोन ईमेल वापरण्याचा सल्ला दिला आहे.

ट्विटमध्ये सल्ला दिला आहे की तुमच्या विश्वासार्ह्य लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारासाठी एक ईमेल वापरा. तर दुसऱ्या ईमेलचा वापर सोशल नेटवर्किंग साईट्सवर नोंदणी करण्यासाठी करा. यामुळे तुमच्या अकाउंटची हॅकर्सपासून रक्षा होईल.

फसवणुकीसाठी ठग सोशल मीडियासाठी वापरलेल्या ईमेल्सचा वापर करत असतात. सूचनेमध्ये म्हटले आहे की, आर्थिक व्यवहारासाठी वापरले जाणाऱ्या अकाउंटला कोणत्याही सोशल मीडिया साईटवर सार्वजनिक करू नये. याशिवाय वेब ब्राउजर्समध्ये क्रेडिट-डेबिट कार्डचा नंबर, सीव्हीव्ही, एक्सपायरी डेट, खाते नंबर अशी माहितीचा उपयोग करताना काळजी घ्यावी.