हजारो कामगारांची कपात करणार जगातील सर्वात मोठी बेवरेज कंपनी

बेवरेज कंपनी कोका-कोलाने कोरोना व्हायरस संकटात आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोका-कोला आपले वर्कफोर्स रिस्ट्रक्चर करण्यासोबतच ऑपरेटिंग यूनिट्स देखील कमी करणार आहे. कंपनीने अमेरिका, कॅनडा आणि पुर्तो रिका येथील आपल्या 4 हजार कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक सेवामुक्ती घेण्यास सांगितले आहे. अन्य बाजारात देखील कंपनीकडून असाच निर्णय घेतला जात आहे.

जगातील सर्वात मोठ्या बेवरेज कंपनीने म्हटले की स्वैच्छिक सेवामुक्तीमुळे काही प्रमाणात कॉस्ट कटिंगमध्ये मदत होईल. यामुळे कंपनीचा ग्लोबल सेपरेशन प्रोग्रामचा खर्च 550 मिलियन डॉलर्सवरून कमी होऊन 350 मिलियन डॉलर्स एवढा होईल.

लॉकडाऊनमुळे जगभरातील बार, हॉटेल्स आणि थिएटर बंद असल्याने कंपनीच्या सेल्समध्ये मोठी घट आली. आता कंपनीने म्हटले आहे की, 4 भौगोलिक विभागात केवळ 9 ऑपरेटिंग यूनिट्स असतील.

अमेरिकेत बेरोजगारी भत्त्यासाठी दिवसेंदिवस हजारो अर्ज येत आहेत. अशा स्थितीमध्ये कोका-कोलाने हा निर्णय घेतला आहे. मागील एका आठवड्यात 10 लाख लोकांनी यासाठी अर्ज केला आहे. कोका-कोलाने सांगितले की त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीत तब्बल 28 टक्के घट आली आहे.