व्हीचॅटवर बंदी घातल्यास अ‍ॅपलवर बहिष्कार टाकणार, चीनची अमेरिकेला धमकी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून चीनी कंपन्या, चीनी अ‍ॅपवर निशाणा साधत आहे. ट्रम्प यांनी चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घालण्याची देखील धमकी दिली आहे. इतर अ‍ॅप देखील ट्रम्प प्रशासनाच्या रडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकी दिली आहे की अमेरिकेने व्हीचॅटवर बंदी घातल्यास चीनचे लोक देखील अ‍ॅपल कंपनीवर बहिष्कार टाकतील.

अमेरिकेत सोशल मीडिया अ‍ॅप व्हीचॅटवर बंदीची मागणी केली जात आहे. ट्रम्प प्रशासन याबाबत लवकरच निर्णय देखील घेम्याची शक्यता आहे. टीक-टॉक आणि व्ही चॅटवर सप्टेंबरपासून बंदी घातली जावू शकते. ट्रम्प यांचा आरोप आहे की, हे अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, व्हीचॅटवर बंदी घातल्यास चीनी नागरिक देखील आयफोन आणि अ‍ॅपलच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकतील. ते देखील आयफोनचा वापर करणे बंद करतील.