ज्या कारणामुळे झाले होते 1962 चे युद्ध, तेथेच रस्त्याची निर्मिती करत आहे चीन

लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. 1962 नंतर पहिल्यांदाच गंभीर स्थिती असल्याचे देखील परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर चीन लडाखच्या सीमाभागातील क्षेत्रात पर्यायी मार्गांची निर्मिती करत आहे. यामुळे चीनी पिपल्स लिबरेशन आर्मीचे जवान त्वरित एकाठिकाणी जमा होऊ शकतात.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सेटेलाईट फोटोवरून संकेत मिळतात की चीनी सैन्य पुर्व लडाखच्या उत्तर-पुर्व भागात नवीन रस्त्याची निर्मिती करत आहे. यात ल्हासा ते काशगरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग 219च्या (जी219) काही भागाचा देखील समावेश आहे. पुर्व लडाख भागातून जाणाऱ्या या रस्त्याची निर्मिती 1950च्या दशकात सुरू केले होते, जे 1957 पर्यंत पुर्ण झाले. 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धाच्या कारणांपैकी एक या रस्त्याचे निर्माण देखील होते.

युद्धानंतर चीनने जी219 द्वारे पश्चिम भागावर ताबा मिळवला होता. जी219 वरील चीनी युद्ध स्मारक या गोष्टींची आठवण करून देतात की, कशाप्रकारे भारतीय सैन्य हिंमतीने लढले. तेव्हापासूनच एलएसीच्या जवळील रस्त्याच्या निर्मितीला दोन्ही देश संशयाने बघतात. लडाख दुर्गम भाग असल्याने, चीनला पुर्व लडाखमध्ये जाण्यासाठी केवळ जी219 हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे चीनला संघर्षाच्या स्थितीमध्ये अडचणीचा सामना करावा लागतो. भारत या क्षेत्रात प्रामुख्याने हवाई दलाचाच वापर करतो.

या नवीन रस्त्याविषयी चीनी सैन्याला वाटते की याचा वापर नैसर्गिक घटना जसे की, भूस्खलन किंवा गोळीबार सारख्या घटनांच्यावेळी करता येईल. कोणत्याही आपत्तीच्या स्थितीमध्ये पुर्व लडाखच्या भागात जवानांना पाठवण्याचा याचा वापर करता येईल.