मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) जम्मूमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर एक भुयार सापडले आहे. या भुयाराची पाहणी केली जात असून, याद्वारे दहशतवादी घुसखोरी आणि मादक पदार्थ, शस्त्रांची तस्करी करत असण्याची शक्यता आहे.
पाकचा घुसखोरीचा डाव उघड, सीमेवर बीएसएफला सापडले गुप्त भुयार
जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना हे सुरंग आढळले. या भुयाराजवळ वाळूच्या पिशव्या देखील आढळल्या आहेत, ज्यावर पाकिस्तानचा उल्लेख आहे. पावसामुळे जमीन धसल्याने जवानांना भुयाराची शंका आली. यानंतर त्वरित पाहणी करण्यासाठी मशीन मागवण्यात आली.
या भुयाराचे काम सुरू होते. हे भुयार जवळपास 20 मीटर आणि 25 मीटर खोल आहे. हे भुयार बीएसएफच्या व्हेलबॅक सीमा चौकीजवळ उघडते. बीएसएफने अशा अनेक गुप्त मार्गांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठे अभियान चालवले. या भुयाराच्या तोंडावर कराची लिहिलेल्या 8 ते 10 वाळूच्या पिशव्या मिळाल्या आहेत.