‘ब्लॅक पँथर’ स्टार चॅडव्हिक बोसमॅनचे निधन

हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ब्लॅक पॅथरचा अभिनेता चॅडव्हिक बोसमॅनचे निधन झाले आहे. कॅन्सरमुळे वयाच्या 43व्या वर्षी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. चॅडव्हिक बोसमॅनच्या निधनाची माहिती समजताच हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकजण शोक व्यक्त करत आहे. चाहते या कलाकाराला श्रद्धांजली वाहत आहेत.

मार्व्हेल सिनेमॅटिक यूनिव्हर्सच्या ब्लॅक पँथर या सुपरहिरो चित्रपटात प्रमूख भूमिका साकारल्याने बोसमॅन घराघरात पोहचला होता. त्याला आतड्यांचा कॅन्सर होता. चॅडव्हिक बोसमॅनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, दिवंगत अभिनेत्याची पत्नी आणि कुटुंब अखेरच्या क्षणी त्याच्यासोबत होती.

बोसमनच्या कुटुंबाने एक स्टेटमेंट जारी करत म्हटले की, एक खरा योद्धा, चॅडव्हिकने आपल्या संघर्षाद्वारे तुमच्यापर्यंत ते सर्व चित्रपट पोहचवले, ज्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिले. कुटुंबाने सांगितले की, 4 वर्षांपासून या आजाराशी लढत होता. ब्लॅक पँथरमध्ये किंग टी-चालाची भूमिका साकारणे त्याच्यासाठी अभिमानाची बाब होती.

विविध क्षेत्रातील मंडळीनी ट्विटरवरून या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली.