5 वर्षांच्या चिमुकल्याची हुशारी, एका खेळण्यामुळे वाचले आईचे प्राण

सोशल मीडियावर एका 5 वर्षांच्या चिमुकल्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. या 5 वर्षांच्या मुलाच्या समजूतदारपणामुळे त्याच्या आईचे प्राण वाचले आहेत. इंग्लंडच्या टेलफोर्ड येथे जोशची आई चक्कर येऊन कोसळली. योग्यवेळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले नसते तर त्यांचा मृत्यू झाला असता किंवा त्या कोमात देखील गेल्या असत्या. मात्र या मुलांमुळे त्यांचे प्राण वाचले.

The quick thinking actions of a 5-year-old boy from Telford helped to save his mum's life last month, after he dialled…

Posted by West Mercia Police on Wednesday, 26 August 2020

जोश चॅपमन आपल्या भावावर बरोबर खेळत होता. यावेळी त्याने पाहिले की आई चक्कर येऊन जमिनीवर कोसळली आहे. यावेळी या चिमुकल्याने हुशारी दाखवत आपल्या रुग्णवाहिकेच्या खेळण्यात देण्यात आलेला 112 हा इमर्जेंसी नंबर लावला. त्याने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, थोडा अधिक उशीर झाला असता तर जोशच्या आईचा मृत्यू झाला असता. पोलीस जोशच्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेथे त्या डायबेटिक कोमामध्ये असल्याचे समोर आले आहे. जोशच्या या बहादुरीसाठी पोलिसांनी देखील त्याचे कौतुक केले.