Viral : BA (honours)च्या पहिल्या मेरीट लिस्टमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या सनी लिओनचे नाव!


बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओन आपल्या मादक अदांनी कायमच घायळ करत असते. त्याचबरोबर ती आपले हॉट फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी सनीने मुलगी निशासोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सनी या व्हिडीओत मुलगी निशा आणि तिच्या मैत्रिणीसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत होती. पण यावेळी सनी लिओन आता सोशल मीडियावरील पोस्टमुळे नव्हे तर एका वेगळ्या आणि अजबच कारणामुळे चर्चेत आली आहे.

सनी लिओनचे नाव कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या वेबसाईटवर झळकल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. BA (honours)च्या प्रवेशाची पहिली मेरीट लिस्ट महाविद्यालयाने जाहीर केली. पण महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या या मेरीट लिस्टमुळे अनेकांची झोपच उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनचे चक्क या लिस्टमध्ये नाव होते. तिच्या नावासोबत अर्जाचा आयडी आणि रोल नंबरही होता. 12वीच्या परिक्षेत चार विषयांत तिला पैकीच्या पैकी मार्क असल्याचे या लिस्टमध्ये दिसत होते. दरम्यान महाविद्यालयाकडून हा खोडकरपणा असून कुणीतरी जाणीवपूर्वक सनी लिओनच्या नावाने अर्ज केला असावा, असे सांगण्यात आले. त्यात दुरुस्ती करण्यास अॅडमिशन विभागाला सांगितले असून याचा तपास केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.