मांजरींवर उपचारासाठी वापरले जाणारे औषध कोरोनावर प्रभावी, वैज्ञानिकांचा दावा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर औषध शोधण्याचे काम सुरू आहे. या आजाराबाबत आणि यावरील औषधांबाबत दररोज नवनवीन संशोधन समोर येत आहे. आता वैज्ञानिकांनी मांजरींचे घातक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपचारासाठी वापरले जाणारे औषध कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असा दावा केला आहे.

एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, या औषधाचा परिणाम कोव्हिड-19 च्या उपचारात नवीन वैद्यकीय पद्धत विकसित करण्यास होऊ शकतो. हे औषध सार्स-कोव्ह-2 द्वारे संक्रमित असलेल्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या पेशांना व्हायरसची प्रतिकृती बनविण्यापासून रोखते.

अल्बर्टा विद्यापीठातील बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक जोआन लेमिक्स म्हणाले, हे औषध मनुष्यावर देखील प्रभावी ठरण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे आम्ही उत्साहित आहोत की हे औषध कोरोनाग्रस्तांवर प्रभावी उपचार ठरेल. वैज्ञानिकांना आढळले की हे औषध कोरोना व्हायरसला वाढण्यापासून रोखते व संसर्ग कमी करण्यास मदत करते. यासंदर्भातील संशोधन नेचर कम्यूनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.