एफडीवर जास्त व्याज हवे असल्यास या योजनेत करा गुंतवणूक, मिळेल जास्त रिटर्न

जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमधून अधिक व्याज हवे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) योजनेत फिक्स डिपॉजिट करणे उत्तम ठरेल. या योजनेंतर्गत तुम्हाला एफडी जास्त व्याज मिळते. सोबतच पैसा देखील सुरक्षित राहतो.

किती मिळते व्याज ?

या योजनेत सध्या 6.8 टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला न्यूनतम 1000 रुपये गुंतवणूक करावे लागेल. आप एनएससीमध्ये कितीही मोठी गुंतवणूक करू शकता. या योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे.

कोण करू शकते गुंतवणूक ?

18 वर्षांवरील व्यक्ती व अल्पवयीन असल्यास त्या व्यक्तीच्या वतीने दुसरी व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेत 3 जण संयुक्त खाते देखील उघडू शकतात.

लहान मुलांच्या नावाने देखील उघडू शकता खाते –

या योजनेत लहान मुलांच्या नावाने देखील खाते उघडता येते. 10 वर्षांखालील मुलांचे खाते पालकांद्वारे उघडता येते. 18 वर्षांचा झाल्यानंतर स्वतःला खात्याची जबाबदारी मिळते.

करात सवलत –

या योजनेत गुंतवणूक केल्याने प्राप्तिकर अधिनियम कलम 80 अंतर्गत करात सूट मिळते. एका आर्थिक वर्षात या योजनेत 1.50 लाख रुपये गुंतवणूक करून करात सूट मिळवू शकता.

दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करू शकता ट्रांसफर –

तुम्ही या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही आपले खाते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देखील ट्रांसफर करू शकता.

किती मिळेल रिटर्न ?

या योजनेत तुम्ही 5 वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5 वर्षांनी 138,949 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला व्याज स्वरूपात 38,949 रुपये व्याज मिळेल. तुम्ही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते सहज उघडू शकता.