इव्हाकांला पाहून लालबुंद झाल्या मेलानिया ट्रम्प, व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिपब्लिकन नॅशनल कन्वेंशनच्या शेटवच्या दिवशी स्टेजवर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि पुर्व पत्नी इव्हाना ट्रम्प यांच्यासोबत इव्हांका ट्रम्प हे दिसले. यावेळी ट्रम्प यांनी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी अधिकृतरित्या नॉमिनेशन स्विकारले.

मात्र सर्वाधिक चर्चा मेलानिया ट्रम्प यांनी इव्हांका ट्रम्पचे स्टेजवर केलेल्या स्वागताच होत आहे. इव्हांका ट्रम्प पिता ट्रम्प यांच्या एक्सेप्टेन्स स्पीजसाठी स्टेजवर स्वागत केले व मेलानिया ट्रम्प यांच्या समोरून जात ट्रम्प यांच्या बाजूला उभी राहिली. यावेळी मेलानिया ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर इव्हांकाला पाहून असे हावभाव झाले की, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मेलानिया यांना इव्हांकाचा रिस्पॉन्स आवडला नसल्याने कदाचित त्या नाराज झाल्या व हसत असतानाच एक सेंकदातच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पुर्णपणे बदलतो. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मेलानिया आणि इव्हांका यांच्यामध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी बघितले असून, अनेकजण यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.