कोरोना व्हायरस महामारीमुळे मास्कची मागणी वाढली आहे. वेगवेगळ्या डिझाईनचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. आता यामास्कला तंत्रज्ञानाची देखील जोड मिळताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक कंपनी एलजीने एक असा मास्क आणला आहे, ज्यात एअर फ्यूरिफायर देण्यात आले आहे. हा पहिला असा मास्क आहे ज्यात प्यूरिफायर फिल्टर देण्यात आले आहे. एलजी प्यूरिकेअर मास्कमुळे ताजी आणि स्वच्छ हवा मिळेल. यात ड्युअल फॅन आणि रेसपिरेट्री सेंसर देखील देण्यात आलेले आहे.
बाजारपेठेत दाखल होणार एअर फ्यूरिफायर असणारा स्मार्ट मास्क
चांगल्या फिटिंगसाठी याचे डिझाईन एरगोनॉमिक बनविण्यात आलेले आहे. एलजी प्यूरिकेअर मास्करचे प्रदर्शन पुढील महिन्यात आयोजित होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक शो आयएफए 2020 मध्ये होईल. किंमत व बाजारात कधी उपलब्ध होईल याची माहिती तेव्हाच मिळेल. एलजी प्यूरिकेअर वियरेबलमध्ये दोन एच13 एचईपीए फिल्टर देण्यात आलेले आहेत. याशिवाय ताज्या हवेसाठी यात ड्युअल फॅन देण्यात आलेला आहे. यात स्पीडसाठी तीन लेव्हल देखील देण्यात आलेले आहे. यात दिलेले रेसपिरेट्री सेंसर श्वास घेण्याच्या गतीचा अंदाज घेऊन फॅनला एडजस्ट करते.
या मास्कमध्ये 820एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी लो मोडमध्ये 8 तासांचा बॅकअ आणि हाय मोडवर दोन तासांचा बॅकअप देईल असा दावा करण्यात आलेला आहे. हे एअर प्यूरिफायर एका अल्ट्रा वॉयलेट केससोबत येते. यात मास्क ठेवल्याने तो व्हायरसमुक्त होतो.
या मास्कला अॅपशी देखील कनेक्ट करता येईल. खराब झाल्यावर युजरला फिल्टर बदलण्याचे नॉटिफिकेशन येईल. या मास्कच्या ईयर स्ट्रॅपला देखील बदलता येते व रिसाइकल करणे देखील शक्य आहे.