आता थेट टिव्हीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करणे होणार शक्य

लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक नवीन व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्स बाजारात आले. अनेक जुन्या अ‍ॅप्सने आपले फिचर अपडेट करत एकावेळी कॉल करणाऱ्यांची संख्या देखील वाढवली. मात्र आता लवकरच थेट टिव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग करणे शक्य होणार आहे. गुगल ड्युओ लवकरच अँड्राईड टिव्हीवर उपलब्ध होणार आहे. सध्या याचे टेस्टिंग बीटा व्हर्जनवर सुरू आहे. लवकरच हे फीचर उपलब्ध होईल.

अँड्राईड टिव्हीवर नवीन अपडेट आल्यानंतर आता स्मार्ट टिव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग करता येईल. याआधी काही दिवसांपुर्वी गुगलने क्रोमकास्टमध्ये गुगल मीटचा सपोर्ट दिला होता. गुगलने आपल्या ब्लॉकमध्ये म्हटले की, मोठ्या स्क्रीनचा उपयोग केवळ मीटिंगसाठीच का, याचा वापर मित्र-कुटुंबाशी व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील व्हायला हवा.

गुगल ड्युओद्वारे अँड्राईड टिव्हीद्वारे युजर्स ग्रुप किंवा वन टू वन व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. तुमच्या टिव्हीला कॅमेरा नसल्यास तुम्ही यूएसबी कॅमेऱ्याचा वापर करू शकता. याशिवाय कंपनी गुगल ड्युआला गुगल मीटसोबत रिप्लेस करण्याची देखील शक्यता आहे.