लडाखमध्ये चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांनी चीनविरोधात आणखी एक निर्णय घेतला आहे. भारताच्या सरकारी रिफाइनरी कंपन्यांनी आता चीनशी संबंधित कंपन्यांकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. याआधी केंद्र सरकारने शेजारील देशांकडून आयात करण्यासंदर्भातील नियम सख्त केले होते. भारत-चीनमधील तणावामुळे 23 जुलैला केंद्र सरकारने नवीन नियम जारी केला होता. नवीन आदेश जारी झाल्यानंतर सरकारी रिफाइनरी कंपन्यांनी आपल्या आयात टेंडरमध्ये याबाबत एक क्लॉज जोडला आहे.
आता या भारतीय कंपन्यानी दिला चीनला मोठा दणका
आज तकच्या वृत्तानुसार, भारताच्या सरकारी रिफाइनरीने चीनी ट्रेंडिंग फर्म CNOOC Ltd, Unipec आणि PetroChina कडून कच्चे तेल आयात करण्यासंदर्भातील टेंडर रोखण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारच्या रिफाइनरी कंपन्या इंडियन ऑयल कॉर्प्स, भारत पेट्रोलियम कॉर्प, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प, मँग्लोर रिफाइनरी आणि पेट्रोकेमिकलकडून अद्याप यावर कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
नवीन नियमांतर्गत भारतीय टेंडरमध्ये भागीदारीसाठी शेजारी देशांच्या कंपन्यांना वाणिज्य विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. चीनी गुंतवणुकीवर निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.