सर्च इंजिन स्पेसमध्ये गुगलचे निर्विवाद वर्चस्व आहे. याहू आणि बिंगने गुगलला टक्कर देण्याचा काहीकाळ प्रयत्न केला. मात्र आता ते या स्थितीमध्ये नाहीत. रिपोर्टनुसार, गुगल सर्च इंजिनला टक्कर देण्यासाठी आता दिग्गज टेक कंपनी अॅपल स्वतःचे सर्च इंजिन आणण्याची शक्यता आहे. अॅपल सध्या आपल्या सर्च इंजिनवर काम करत आहे.
गुगल सर्चला टक्कर देण्यासाठी अॅपल आणणार स्वतःचे सर्च इंजिन!
आज तकच्या वृत्तानुसार, अॅपल आपल्या स्पॉटलाईट सर्च इंजिनसाठी इंजिनिअर्सला नोकरी देत आहे. स्पॉटलाईट मॅक ओएसमध्ये एक महत्त्वपुर्ण फीचर आहे. जेथून मॅकबुकवर वेब सर्च करता येते. अॅपलने आपल्या नवीन आयओएस व्हर्जनमध्ये गुगल सर्चला बायपास केल्याचे सांगितले जाते. अॅपलने आपल्या सर्च इंजिनसाठी जो नोकरी अर्ज मागवला आहे, त्या जाहिरातीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग आणि नॅच्युरल लॅग्वेज प्रोसेसिंगबाबत उल्लेख केला आहे. यामुळे कंपनी सर्च इंजिनच तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.
गुगल अॅपलला दरवर्षी आयफोन, आयपॅड आणि मॅक आयओएसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवम्यासाठी कोट्यावधी रुपये देते. रिपोर्टनुसार हा करार लवकरच समाप्त होणार आहे. अॅपलला सर्चमध्ये जास्त गुंतवणूक करत असून, रिसोर्सेज देखील लावत आहे. त्यामुळे गुगल सर्चला टक्कर देण्यासाठी अॅपल स्वतःचे सर्च इंजिन लाँच करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.