धक्कादायक : धोनीच्या CSK मधील 13 सदस्यांना कोरोनाची लागण

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या हंगामाला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. कोरोना संकटाच्या काळात खेळाडू, संघ आणि बीसीसीआय देखील विशेष खबरदारी घेत आहे. मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. सर्व संघ युएईला पोहचले असून, धोनीच्या संघातील 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एका गोलंदाजाचा देखील समावेश आहे. यासंदर्भात पंजाब केसरीने वृत्त दिले आहे.

जे 12 सदस्य कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत, त्यांच्यामध्ये सपोर्ट स्टाफ आणि सोशल मीडिया टीमच्या सदस्यांचा समावेश आहे. सोबतच एका गोलंदाजाला देखील कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्याच्या नावाची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या एमओपीच्या दिशानिर्देशांचे सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन चेन्नईचा संघ करत आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्स किंवा बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चेन्नईच्या सर्व सदस्यांनी 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण केलेला आहे. मात्र अद्याप ट्रेनिंग सुरू केलेले नाही. मात्र बंगळुरू, राजस्थान आणि पंजाबच्या संघाने प्रॅक्टिस सुरू केली आहे.

दरम्यान, येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयपीएलचे आयोजन करण्यात आलेले आहे.