विराट होणार ‘बापमाणूस’! जानेवारीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन


क्रिकेट आणि सिनेक्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत असलेले जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का यांचा उल्लेख करावा लागेल. कारण या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम हे जगजाहिर आहे. त्यातच आता त्यांच्या या प्रेमाच्या झाडाला मोहर फुटणार आहे. कारण नवीन वर्षात कोहली कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज स्वतः विराट कोहलीने दिली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोला जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार, असे कॅप्शन दिले आहे.

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

Posted by Virat Kohli on Wednesday, 26 August 2020

फेसबुकच्या माध्यमातून विराट आणि अनुष्काने गुड न्यूज दिल्यानंतर त्यांचे अभिनंदन होत आहे. दोघांच्याही या पोस्टला अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारो लाईक्स मिळाले आहेत. फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोत अनुष्का बेबी बंप दाखवताना दिसत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये विराट आणि अनुष्का विवाहबद्ध झाले. अतिशय मोजक्या जणांच्या साक्षीने दोघे इटलीत विवाहबद्ध झाले.

दरम्यान आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करणारा विराट कोहली सध्या दुबईत असून त्याने कालच दुबईत आल्यानंतर आपल्या हॉटेलच्या रुमवर एक फोटो काढत चाहत्यांना आपण दुबईत सुखरुप पोहचल्याचे सांगितले होते.