आधी स्वतःचे राज्य व्यवस्थित सांभाळा, मग दुसरी राज्य सांभाळायला जा; नारायण राणेंचा टोला


मुंबई – बिगर भाजपशासित राज्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते. यावरुन राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. ज्यांना महाराष्ट्र नीट सांभाळता येत नाही आणि ते चालले देशातील दुसरी सांभाळायला, असे ट्विट करत राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, कधीही आडपदडा ठेवून उद्धव ठाकरे बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल. नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या या विधानावरून राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला, असे नारायण राणे म्हणाले.