तुमच्यापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे पोहचले नसतील तर येथे कर तक्रार

मोदी सरकारने या महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. योजनेच्या सहाव्या हफ्त्यासाठी 17 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी घेऊ शकतात. योजनेंतर्गत पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हफ्त्यांमध्ये एकूण 6 हजार रुपये जमा होतील.

जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसल्यास तुम्ही हेल्पलाइन नंबर 155261 वर तक्रार करू शकता. सोबतच टोल फ्री नंबर 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क कर शकता. तुमची तक्रार ई-मेल आईडी pmkisan-ict@gov.in वर देखील पाठवता येईल.

असे तपासा शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे –

  • सर्वात प्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in  वर जा.
  • वेबसाईटवर उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ पर्यायाच्या खालील ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर पैकी एक माहिती द्यावी.
  • माहिती दिल्यानंतर तुम्हाला ‘Get Data’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही याची माहिती मिळेल.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि आधार-बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. फेब्रुवारी 2019 पासून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असून, आतापर्यंत 6 हफ्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.