अमेरिकेची इलेक्ट्रिक ट्रक स्टार्टअप कंपनी निकोला कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि चेअरमन ट्रेव्हर मिल्टन कंपनीच्या सर्वात पहिल्या कर्मचाऱ्यांना स्वतःचे तब्बल 60 लाख शेअर्स देणार आहे. या शेअर्सची किंमत सध्या 233 मिलियन डॉलर्स (जवळपास 1720 कोटी रुपये) आहे. ट्रेव्हर यांनी या कर्मचाऱ्यांना नोकरी देताना याबाबतचे वचन दिले होते.
कमालच! आपल्या 50 कर्मचाऱ्यांना 1700 कोटींचे शेअर्स देणार हा उद्योगपती
मिल्टन म्हणाले की, जेव्हा मी कंपनीची सुरुवात केली त्यावेळी जगातील सर्वोत्तम कर्मचाऱ्यांना शोध घेत होतो आणि हा एक मोठा धोकाच होता. आमच्या यशस्वी होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर होती. मात्र मला असे सर्वोत्तम कर्मचारी भेटले ज्यांच्यासोबत मी पहिल्या दिवसापासून काम करत आहे. नॅसडॅकवर रिव्हर्स मर्जद्वारे ट्रेंडिंगमुळे निकोलाचे स्टॉक वधारले आहेत.
मिल्टन स्वतःला सीरियल उद्योगपती मानतात. ते हाय स्कूलमध्ये नापास झाले व त्यानंतर जनरल एज्यूकेशन डेव्हलपमेंट टेस्ट पास केली होती. 37 वर्षीय मिल्टन यांची नेटवर्ध 4.6 बिलियन डॉलर्स आहे. जगातील सर्वात श्रीमंत 500 व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे.