कोरोनामुळे आरोग्याबाबत सतर्क झाले नागरिक, लाखो लोकांनी घेतला कोविड -19 विमा सुरक्षा कवच

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात नागरिक आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात सतर्क झाले आहे. लोक आरोग्यासंबंधित विमा योजनांचा लाभ घेत आहे. कोव्हिड-19 शी संबंधित विमा पॉलिसी अंतर्गत 15 लाखांपेक्षा अधिक लोकांना विमा सुरक्षा कवच घेतला आहे. भारतीय विमा विकास आणि नियामक प्राधिकरणाचे (इरडा) चेअरमन सुभाष सी खुंटिया यांनी याबाबत माहिती दिली.

खुंटिया म्हणाले की, विमा कंपन्यांना अशा कठीण स्थितीमध्ये विमाधारकांसाठी पुढे यायला हवे. इरडाने विमा कंपन्यांना कोरोना व्हायरस पॉलिसी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक सादर करण्यास सांगितले.

ते म्हणाले की, या कठीण काळात कंपन्यांनी पुढे यावे. ही ग्राहकांची बदलती गरज आहे. याचा योग्यरित्या अभ्यास करायला हवा व ही गरज पुर्ण करायला हवी.

त्यांनी माहिती दिली की, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये या दोन विमा पॉलिसींतर्गत 15 लाखांपेक्षा अधिक लोकांना विमा सुरक्षा घेतली आहे. हे ग्राहकांची मागणी दर्शवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही