गाडीवर FASTag नसल्यास नवीन नियमांनुसार मिळणार नाही ही सूट


नवी दिल्ली – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी सर्व राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर परतीचा प्रवास टोल माफ किंवा इतर कोणत्याही सवलतींसाठी ‘फास्टॅग’ वापरणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार, जो वाहनचालक परतीचा प्रवास सवलत किंवा इतर कोणत्याही स्थानिक सवलतीचा दावा 24 तासांच्या आत करत असेल त्यांनी त्यांच्या वाहनावर वैध ‘फास्टॅग’ लावणे अनिवार्य असेल.

राष्ट्रीय महामार्गांच्या ड्युटी प्लाझावर डिजिटल पेमेंटच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशी सवलत मिळण्यासाठी शुल्क केवळ प्री-पेड पद्धती, स्मार्ट कार्ड किंवा ‘फास्टॅग’ इत्यादीद्वारे घेतले जाईल.

वरील सुधारणेमुळे असेही शक्य होईल जेव्हा 24 तासात परतीच्या प्रवासासाठी सवलत उपलब्ध असेल तर पूर्वीची पावती किंवा माहिती देण्याची गरज भासणार नाही आणि संबंधित नागरिकाला आपोआपच सूट मिळेल. यासाठी आवश्यक आहे की परतीचा प्रवास 24 तासांच्या आत केला जाणे आवश्यक आहे आणि संबंधित वाहनास एक कार्यरत ‘फास्टॅग’ लावलेला असावा.