अमेरिकेची जिरवण्यासाठी चीनने डागली क्षेपणास्त्र

चीनने पुन्हा एकदा दक्षिण चीन सागरात क्षेपणास्त्र डागत वाद निर्माण केला आहे. चीनी माध्यमांनुसार चीनने कॅरियर किलर नावाची दोन क्षेपणास्त्र दक्षिण चीन सागरात डागली आहेत. अमेरिकेला चेतावणी देण्यासाठी ही क्षेपणास्त्र डागली आहेत. चीनने हे पाऊल अमेरिकेच्या हवाई सीमेजवळ उड्डाण घेण्यास केलेल्या विरोधाला उत्तर देण्यासाठी उचलले. DF-26B आणि DF-21D क्षेपणास्त्र हेनान आणि पारसेल बेटाच्या मध्ये डागण्यात आले. हे दोन्ही क्षेपणास्त्र मध्यम अंतरावर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत. क्षेपणास्त्र दागल्यामुळे या भागात काहीवेळासाठी हवाई उड्डाण रोखण्यात आले होते.

काही दिवसांपुर्वी अमेरिकेची युद्धनौका रोनाल्ड रिगनने या पारसेल बेटाच्या भागातच युद्धाभ्यास केला होता. चीनने यामुळेच क्षेपणास्त्रांची ही जागा निवडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय चीन अमेरिकेचे गुप्तहेर विमान यू2 च्या उड्डाणांमुळे देखील नाराज आहे.

DF-21D क्षेपणास्त्राला कॅरियर किलर म्हटले जाते. एखाद्या युद्धनौक्यावर या क्षेपणास्त्राचा मारा केल्यास युद्धनौका पुर्णपणे नष्ट होईल. शांघायच्या दक्षिणेतील झेजियांग प्रांतातून डीएफ -21 डी क्षेपणास्त्र डागण्यात आले. डीएफ -26बी क्षेपणास्त्र वायव्येतील किनघाई प्रांतातून लाँच करण्यात आले होते.  डीएफ -26बी क्षेपणास्त्र पारंपारिक आणि अणवस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे.

अमेरिकेने 24 कंपन्यांना चीनी सैन्याची मदत करणाऱ्या सूचीत टाकले आहे. यामुळे कंपन्या अमेरिकेत व्यवसाय करू शकणार नाही. या कंपन्या आणि संबंधित अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल. अमेरिकेचा आरोप आहे की या कंपन्या दक्षिण चीन सागरात आर्टिफिशियल बेट बनवून चीनला सैन्य अड्डा बनविण्यास मदत करत आहे. दुसरीकडे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, हा एक केवळ युद्धाभ्यास होता. अमेरिकन गुप्तचर विमानांचे उड्डाण चिथावणीखोर आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते वू कीन म्हणाले की, अमेरिकेकडे अशी कृत्ये थांबवण्याची मागणी केली आहे. जर अमेरिकेने असाच युद्धाभ्यास चालू ठेवल्यास चीन त्याला ठोस प्रत्युत्तर देईल.