अरे देवा….! तब्बल 30 हजार प्रतिकिलो दराने विकली जाते ही भारतीय भाजी

जगभरात शेकडो विविध प्रकारच्या भाज्या आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे ? भारतातील सर्वात महाग भाजी हिमालयामधून येते. या भाजीला जगभरात मोठी मागणी आहे. या किलो भाजीची किंमत तब्बल 30 हजार रुपये आहे. ही भाजी शिजवण्यासाठी देखील विशेष मेहनत करावी लागते. ही भाजी खाल्याने ह्रदयासंबंधी आजार होत नाही. ही भाजी एकप्रकारे मल्टी-व्हिटॅमिनची नैसर्गिक गोळीच आहे.

या भाजीचे नाव गुच्छी आहे. ही भाजी हिमालयात मिळणाऱ्या जंगली मशरूमची प्रजाती आहे. ही भाजी बनवण्यासाठी ड्राय फ्रूट, भाज्या आणि देशी तूप लागते. भारतातील या दुर्मिळ भाजीची परदेशात देखील मोठी मागणी आहे. ह्रदयाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज ही भाजी खाल्यास त्यांना नक्कीच याचा फायदा होतो. गुच्छीला हिमालयाच्या पर्वतांमधून आणून सुकवले जाते. यानंतर बाजारात याची विक्री केली जाते.

Image Credited – Aajtak

गुच्छीचे वैज्ञानिक नाव मार्कुला एस्क्यूपलेंटा आहे. सर्वसाधरणपणे या भाजीला मोरेल्स किंवा स्पंज मशरूम म्हणतात. ही भाजी हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिरच्या पर्वतांमध्ये अधिक आढळते. अनेक पावसाळ्यात आपोआप उगवते. गुच्छीला पावसाळ्यात जमा करून सुकवले जाते. त्यानंतर हिवाळ्यात त्याचा अधिक वापर केला जातो. अमेरिका, युरोप, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडमधील लोकांना ही भाजी खूप आवडते. गुच्छी पुरेसे प्रमाणात जीवनसत्त्वे बी, डी, सी आणि के आढळतात.

Image Credited – Aajtak

नैसर्गिकरित्या ही भाजी फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात अधिक आढळते. मोठ्या कंपन्या 10 ते 15 हजार रुपये प्रति किलोच्या हिशोबाने याची खरेदी करतात. बाजारात याची 25 ते 30 हजार रुपयाने देखील विक्री होते. या भाजीचा अभ्यास करणारे वैज्ञानिक सांगतात की, लोक देखील डोंगरात ही भाजी निवडण्यास जात नाही. कारण एकदा जेथे भाजी उगवली आहे, तेथेच ही भाजी परत उगवले हे गरजेचे नाही. कधीकधी सरळ चढावर किंवा खोल दरीत तर कधीकधी अशा जागा डोंगरांवर येते जेथे जाणे अशक्य आहे.

Image Credited – Aajtak

बहुतांश लोकांना सुकलेली गुच्छीची भाजी खावी लागते. यात तो स्वाद आणि स्पंजीनेस नसतो, जो ताज्या भाजीत येतो. काश्मिरमधील लोक जेव्हा ताज्या ताज्या भाजीला मसल्यांसोबत शिजवतात, तेव्हा याचा स्वाद काही वेगळाच असतो. अनेक हॉटेलमध्ये गुच्छीचे कबाब प्रसिद्ध आहेत. काही लोक यापासून मिठाई देखील बनवतात. गुच्छीचा पुलाव देखील बनवला जातो.