डुकाटीची लाखमोलाची Panigale V2 सुपरबाईक भारतात लाँच

लग्झरी सुपर बाईक्स बनवणारी कंपनी डुकाटीने भारतात Panigale V2 बाईक लाँच केली आहे. या सुपरबाईकची एक्स-शोरुम किंमत 16.99 लाख रुपये आहे. या बाईकमध्ये रेस, स्पोर्ट आणि स्ट्रिट असे 3 मोड्स देण्यात आलेले आहेत. चालक हँडलमध्ये दिलेल्या स्विचगिअरचा वापर करून यातील कोणताही मोड निवडू शकतो. प्रत्येक रायडिंग मोडच्या सेटिंग्सला 4.3 इंच टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोलद्वारे एडजस्ट करता येईल.

Image Credited – navbharattimes

डुकाटी Panigale V2 मध्ये 955सीसी सुपरक्वार्डा, ट्विन-सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 155 पीएस पॉवर आणि 104 एनएम टॉर्क जनरेट करते. डुकाटीचे हे वर्षातील पहिलेच बीएस6 लाँच आहे. बाईकमध्ये स्लिपर क्लचसह 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 1 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये कंपनीने या बाईकचे बुकिंग आधीच सुरु केले होते.

Image Credited – navbharattimes

Panigale V2 चे अनेक डिझाईन एलिमेंट्स Panigale V2 मधून घेण्यात आलेले आहेत. ज्यात एलईडी डीआरएलसोबत LED हेडलॅम्प, दोन मोठे एअर इनटेक्स, एक टॉल विंडस्क्रीन, डबल लेयर फेयरिंग, मस्क्यलर फ्यूल टँक, सेट-अप स्टाइल स्पिल्ट सीट आणि सिग्नेचर 5-स्पोक एलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. जगभरात Panigale डुकाती रेड आणि रेड एक्सेंट्ससोबत व्हाइट रोसो या 2 रंगात उपलब्ध आहे.

Image Credited – BikeDekho

डुकाती Panigale V2 टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोल आणि दुसरे इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स देण्यात आलेले आहेत. डुकाटीच्या बाईकमध्ये अपडेटेड सस्पेंशन सेटअप देण्यात आलेला आहे, ज्यात फ्रंटला फूल एडस्टेबल 43एमएम Showa Big पिस्टन फॉर्क आणि रिअरमध्ये फुली एडजस्टबल साइड-माउंटेड Sachs मोनोशॉक मिळेल.