येथून स्वस्तात बुक करा घरगुती सिलेंडर, होईल 50 रुपयांची बचत

एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना आता ऑनलाईन बुकिंग केल्यास मोठी सूट मिळणार आहे. गॅसधारकांनी अ‍ॅमेझॉन पे वरून गॅस सिलेंडर बुक केल्यास 50 रुपये परत मिळणार आहेत. अ‍ॅमेझॉन पे वरुन इण्डेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस कंपन्यांचे सिलेंडर बुक करता येतात. अ‍ॅमेझॉन पे सिलेंडर बुकिंगवर 50 रुपये कॅशबॅक देत आहे.

यासाठी तुम्हाला अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या पेमेंट पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या गॅस सर्व्हिस प्रोव्हाईडर्सची निवड करावी लागेल. त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा एलपीजी नंबर टाकावा लागेल. तुम्हाला अ‍ॅमेझॉन पे वरून गॅसचे पैसे भरावे लागतील. ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंतच आहे. सिलेंडरचे पेमेंट केल्यानंतर तुमच्या घरी डिलिव्हरी होईल.

तुम्ही उमंग अ‍ॅपच्या मदतीने देखील भारत, इण्डेंन आणि एचपीसह इतर कंपन्यांचे घरगुती सिलेंडर बुक करता येईल. यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन करून, पुढे दिलेल्या निर्देशांचे पालन करून गॅस बुक करू शकता. मागील काही दिवसांमध्ये घरगुती सिलेंडर्सच्या किंमती वाढल्या आहेत. अ‍ॅमेझॉन पे वरून गॅस बुक करून तुम्ही पैशांची बचत करू शकता.