ऑडी इंडियाने देशातील आपली सर्वात दमदार एसयूव्ही आरएस क्यू8 लाँच केली आहे. ऑडीने वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात क्यू8 लाँच केली होती. आता याचे आणखी दमदार व्हर्जन बाजारात दाखल झाले आहे. नवीन 2020 आरएस क्यू8 ला कंपनीने 2.07 कोटी रुपये एक्स-शोरुम किंमतीत लाँच केले आहेत. कंपनीने आधीच या एसयूव्हीचे बुकिंग सुरू केले होते. ऑडी इंडियाद्वारे लाँच करण्यात आलेले हे दूसरे आरएस मॉडेल आहे. कंपनीच्या 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की एसयूव्ही कूपसोबत हाय परफॉर्मेंस स्पोर्ट्स कारचा रोमांच देण्यात आला आहे.
ऑडीची नवी कोरी शानदार RS Q8 कूप एसयूव्ही भारतात लाँच
आरएस क्यू8 सोबत केवळ आरएससाठी बनविण्यात आलेली ऑक्टागनल सिंगलफ्रेम रेडिएटर ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय दमदार लूकसाठी ग्लॉस ब्लॅक आरएस हनीकॉम्ब ग्रिल दिली आहे. याच्या दोन्ही बाजूला एअर इंटेक्ससोबत मोठ्या आकाराच्या एसयूव्ही कूपचा अनुभव देणारे ब्लेड्स देखील ग्लॉक ब्लॅक शेडमध्ये दिले आहे.
कॅबिनमध्ये व्हर्च्युअल कॉकपिट इंस्ट्रूमेंट कंसोल, आरएस स्पेसिफिकेशन फ्लॅट-बॉटम स्टेअरिंग व्हिल, ड्युअल टचस्क्रीन इंफोटनमेंट सिस्टमसोबत एमएमआय यूजर इंटरफेस सारखे फीचर्स देण्यात आलेल आहेत.
ऑडी इंडियानुसार नवीन एसयूव्ही हाय परफॉर्मेंस आहे. आरएस क्यू8 सोबत 4 लीटरचे व्ही8 इंजिन देण्यात आलेले आहे, जे 600 बीएचपी पॉवर आणि 800 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आलेले आहे. हे बाय-टर्बो व्ही8 इंजिन माइल्ड हायब्रिड सिस्टमसोबत येते, जे 48-वॉल्ट इलेक्ट्रिक सिस्टमवर आधारित आहे. नवीन कूप एसयूव्ही केवळ 3.8 सेंकदात ताशी 0 ते 80 किमी आणि 13.7 सेंकदात 0-200 किमीचा वेग पकडते. या एसयूव्हीचा टॉप स्पीड ताशी 305 किमी आहे. भारतीय बाजारात ही कार पॉर्श कायेन कूप, बीएमडब्ल्यू एक्स6 एम सारख्या कार्सला टक्कर देईल.