अॅपवर आधारित कार सेवा देणारी कंपनी उबरने भारतात ऑटो रेंटल्स सेवा सुरू केली आहे. ही सेवा मागणीनुसार 27X7 उपलब्ध असेल. कंपनीनुसार या सेवेंतर्गत ग्राहक ऑटोला अनेक तासांसाठी बुक करू शकतात व प्रवासादरम्यान ग्राहकांना अनेक ठिकाणी थांबण्याची सूट देखील मिळाली. कंपनीची ही सेवा पुणे, मुंबई, बंगळुरू दिल्ली एनसीआर, हैद्राबाद या शहरात उपलब्ध आहे.
कंपनीनुसार एक तास आणि 10 किमी अंतराच्या पॅकेजसाठी 169 रुपयांपासून शुल्क आकारले जात आहे. या सेवेंतर्गत 8 तासांपर्यंत बूक करता येईल. उबरचे अधिकारी नीतिश भूषण म्हणाले की, हा भारतातील पहिला नवीन प्रयोग आहे. तंत्रज्ञानाला ग्राहक आणि ड्रायव्हरसाठी कशाप्रकारे उत्तम बनवता येईल हे याचे उत्तम उदाहरण आहे.
याआधी उबरने इंट्रासिटी रेंटल सेवा सुरू केली होती. या सेवेंतर्गत ग्राहक ड्रायव्हरला कोठेही गाडी थांबविण्यास सांगू शकतात.