दिल्लीत आज संसद भवनाजवळ एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. हा संशयित विजय चौकजवळ फेऱ्या मारताना आढळला. संशयिताकडे एक चिठ्ठा आढळली असून, यावर एक कोडवर्ड लिहिलेला आहे. ड्यूटीवर तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी या संशयित व्यक्तीला पकडले. सध्या त्याची दिल्लीच्या संसद मार्ग स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. पोलिसांव्यतिरिक्त आयबी आणि अन्य गुप्तचर संस्था त्याची चौकशी करण्यात येत आहे.
संसद भवनाजवळ संशयित ताब्यात, सापडला कोडवर्ड लिहिलेला कागद
न्यूज 18 च्या वृत्तानुसार पकडण्यात आलेला व्यक्ती संसद भवनाच्या आजुबाजूला फिरत होता. चौकशी केल्यावर तो वेगवेगळी माहिती देऊ लागला. त्याच्याकडे आधार कार्ड आणि एक ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ओळखपत्रामध्ये त्याची नावे वेगवेगळी आहेत. ड्रायव्हिंग लासयन्सवर नाव फिरदौस आहे. तर आधार कार्डवरील नाव मंजूर अहमद अहंगेर आहे.
पोलिसांनी सांगितले की, त्याच्याजवळ एक बॅग आढळली आहे. आधी या संशयिताने तो 2016 साली दिल्लीत फिरायला आला होता असे सांगितले. त्यानंतर त्याने लॉकडाऊनमध्ये येथे आला होता असे सांगितले. दिल्लीमध्ये तो जेथे थांबला होता, त्याची देखील वेगवेगळी माहिती दिली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.