नीट-जेईई परीक्षेबाबत राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता, सरकारला दिला हा सल्ला

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात घेण्यात येणाऱ्या नीट-जेईई परीक्षेला विरोध वाढताना दिसत आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. काँग्रेससह विरोधी पक्ष देखील आता कोरोना काळात परीक्षा घेण्याला विरोध करत असून, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सरकारला याविषयी योग्य समाधान काढण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि बीजेडीसह अनेक पक्षांनी विद्यार्थ्यांची मागणीला पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केले की, नीट-जेईई उमेदवारांना आपल्या आरोग्य आणि भविष्याबाबत चिंता आहे. त्यांना काही वास्तविक चिंता आहे – कोव्हिड-19 संसर्गाचा धोका, महामारी दरम्यान प्रवास, आसाम-बिहारमधील पूरस्थिती.

सरकारने सर्व पक्षांचे मत जाणून घेऊन या प्रकरणावर योग्य ते समाधान शोधावे, असा सल्ला देखील राहुल गांधींनी यांनी केले. दरम्यान, कोरोना संकटात सरकार या परीक्षा घेण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.