उत्तर कोरियाच्या हुकुमशाहाचा नवीन फोटो आला समोर, कोमात गेल्याची सुरू होती चर्चा

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. किम जोंग उन कोमामध्ये असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला होता. आपल्या नेत्याच्या प्रकृतीबाबत होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम देत उत्तर कोरियाने किम जोंग उन यांचा नवीन फोटो जारी केला आहे.

नवीन फोटोमध्ये किम जोंग हे पक्षाच्या सदस्यांसोबत एका बैठकीत सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना व्हायरस आणि टाइफून चक्रीवादळासंदर्भातील उपाययोजनांबाबत बैठक बोलवण्यात आली होती.

Image Credited – navbharattimes

याआधी दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी किम जोंग उन हे कोमात असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, हुकुमशाहच्या अनुपस्थितीमध्ये उत्तराधिकाराची योजना अद्याप पुर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची बहिण किम यो जोंग देशाची धुरा सांभाळत आहे.

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत अशी चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काही महिन्यांपुर्वी ते कोमात गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र नंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहत चर्चांना पुर्णविराम दिला होता.