नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 1 लाखांपर्यंत पगार

तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) आपल्या मुंबई येथील NABFOUNDATION कार्यालयात असिस्टंट मॅनेजर पदासाठी नॉटिफिकेशन जारी केले आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने मान्यता प्राप्त कॉलेजमधून सोशल वर्क ((MSW) आणि एमए डेव्हलपमेंट स्टडिज किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराकडे सामाजिक क्षेत्रातील प्रकल्पात कामाचा जवळपास 5 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वय –

इच्छुक उमेदवाराचे वय किमान 30 वर्ष आणि कमाल 50 वर्ष असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया –

उमेदवारांच्या योग्यता, अनुभवाच्या आधारावर 1:10 या प्रमाणात मुलाखतीच्या आधारावर निवड केली जाईल. मुलाखतीनंतर नाबार्डची  वेबसाईट www.nabard.org वर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

पगार –

निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार ते 1 लाख रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल.

अर्ज प्रक्रिया –

7 सप्टेंबर 2020 पर्यंत इच्छुक व पात्र उमेदवार आपला बायोडाटा [email protected] वर पाठवू शकतात. उमेदवार अर्ज प्रक्रिया व अधिक माहितीसाठी नाबार्डच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.