या पॉलिसीत करा गुंतवणूक, आयुष्यभर कमाईची एलआयसी देत आहे गॅरंटी

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) एक खास पॉलिसी लाँच केली आहे. या पॉलिसीचे नाव जीवन अक्षय-7 (प्लॅन नंबर 857) आहे. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर कमाई करू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

एलआयसीची जीवन अक्षय-7 सिंगल प्रिमियम असणारी नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी योजना आहे. कोणत्याही एन्युटी योजनेत एकरक्कमी गुंतवणूक केल्यानंतर निश्चित रक्कम ठराविक कालावधीमध्ये मिळत राहत असते. या पॉलिसीमध्ये वार्षिक, सहामाही आणि त्रैमासिक आणि मासिक अशी गुंतवणूक करता येते. पॉलिसीच्या सुरुवातीला एन्युटीच्या दरांची गॅरेंटी दिली जाते.

ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल. या योजनेची किमान खरेदी किंमत 1 लाख रुपये आहे. जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही.

हा प्लॅन 30 ते 85 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. दिव्यांगासाठी देखील ही योजना फायदेशीर आहे. या योजनेत कोणत्याही कुटुंबातील दोन व्यक्तींचे ज्वाइंट लाइफ एन्युटी काढता येईल. विमा घेतल्यानंतर तीन महिन्यांनी कर्जाची सुविधा देखील मिळते. म्हणजेच विमाधारक यातून कर्ज देखील घेऊ शकते.