… म्हणून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, आयसीएमआर महासंचालकांनी सांगितले कारण

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारकडून उपाययोजना करूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे महासंचालक बलराम भार्गव यांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्यामागे लोकांचा बेजबाबदारपणा असल्याचे म्हटले आहे.

भार्गव म्हणाले की, लोकांनी मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेंसिंग न पाळल्याने भारतात कोरोना व्हायरस महामारी वाढली आहे. त्यांनी सांगितले की, आयसीएमआरने दुसरा राष्ट्रीय सीरा सर्व्हे सुरु केला आहे. जो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुर्ण होईल.

भार्गव म्हणाले की, जवान आणि वृद्ध असे करत आहेत असे मी म्हणार नाही. मात्र काही बेजबाबदार, कमी जागरुक लोक मास्क घालत नाही आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत नाही. यामुळे भारतात महामारी वाढत आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांच्या पुढे गेला आहे.