होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपली लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक कार ‘होंडा जॅझ 2020’ ला अधिकृतरित्या लाँच केले आहे. नवीन होंडा जॅझला नवा लूक, प्रिमियम स्टाइल, एक नवीन फ्लॅगशिप ग्रेज जॅझ झेडएक्स आणि सेगमेंट लिडिंग फीचर्ससोबत लाँच करण्यात आले आहे.
नव्या लूकमध्ये ‘होंडा जॅझ 2020’ भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
एक्सटीरियर डिझाईनच्या बाबतीत नवीन होंडा जॅझ अनेक आधुनिक फीचर्ससोबत येते. यात न्यू क्रोम एसेंचुएटेड हाय ग्लॉस ब्लॅक ग्रिल, डीआरएलसोबत नवीन एलईडी हेडलॅम्प (इनलाइन शेल) सोबत अॅडवांस्ड एलईडी पॅकेज, नवी एलईडी फॉग लॅम्प, सिग्नेचर रियर एलईडी विंग लाइट आणि नवीन प्रकार डिझाईन केलेले फ्रंट आणि रियर बंपर्स दिले आहेत. याचे खास फीचर वन टच इलेक्ट्रिक सनरूफ आहे. जे प्रिमियम हॅचबॅकमध्ये एक नवीन ट्रेंड सेटर करेल.
नवीन जॅझला इंटिरिअर आरामदायक कॅबिन प्रदान करते. ग्राहकांना यात अॅडवांस्ड इंटेरियर इक्विपमेंट आणि कम्फर्ट फीचर्स सारखे क्रूज कंट्रोल, टचस्क्रीन पॅनेलसोबत ऑटो एसी, एलसीडी डिस्प्ले आणि ईको असिस्ट एम्बिएंट रिंग्ससोबत मल्टी इंफॉर्मेशन कॉम्बी मीटर, स्टेअरिंग माउंडेट ऑडिओ, टेलिफोनी आणि वॉयस कंट्रोल्स, व्हाइट आणि रेड कलरमध्ये वन पूश स्टार्ट/स्टॉप बटन आणि किलेस रिमोटसह होंडा स्मार्ट सिस्टम देण्यात आली आहे.
नवीन जॅझच्या इंजिनबद्दल सांगायचे तर याच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये बीएस-6 मानक 1.2 लीटर आय-व्हीटेक पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 6000 आरपीएम 90पीएस पॉवर आणि 4800 आरपीएम 110 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन सुसज्ज आहे. नवीन जॅझचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट ड्रिम्स टेक्नोलॉजी सीरिजच्या होंडाच्या अॅडवांस्ड सीव्हीटी टेक्नोलॉजीसोबत येतो. नवीन जॅझमध्ये अॅडवांस्ड इंफोटेनमेंट सिस्टम डिजीपॅड 2.0 देण्यात आले आहे. हे स्मार्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करते. 17.7 सेमी अॅडवांस्ड टचस्क्रीन ऑडिओ, व्हिडीओ आणि नेव्हिगेशन सिस्टम अॅपल कार प्ले, अँड्राईड ऑटो, वेबलिंकद्वारे स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळते.
सेफ्टी फीचर्समध्ये स्टँडर्ड ड्युअल फ्रंट एसआरएस एयरबॅग्स, ईबीडीसोबत एबीएस, गाइडलाइंससह मल्टी-व्यू रियर कॅमरा, रियर पार्किंग सेंसर, पिंच गार्डसह ड्राइवर साइड विंडो वन टच अप/डाउन ऑपरेशन, इम्पॅक्ट मिटीगेटिंग फ्रंट हेड रेस्ट, इमोबिलाइजर अँटी-थेफ्ट सिस्टम, पेडेस्ट्रियन इनजरी मिटिगेशन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. नवीन जॅझ व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स या मॅन्युअल आणि सिव्हीटी पेट्रोल इंजिनसोबत उपलब्ध आहे. याच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 7,49,900 रुपयांपासून सुरू आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 9,73,900 रुपये आहे.