चीन सीमेवर भारताची ताकद वाढणार, आयटीबीपीला मिळणार 7 नवीन बटालियन

सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सुरक्षा दलांची ताकद वाढवत आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालय आयटीबीपीला लवकरच 7 नवीन बटालियन देण्यास तयार झाले आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, कॅबिनेटच्या मंजूरीनंतर नवीन बटालियनसाठी जवानांची निवड सुरू होईल. मागील अनेक वर्षांपासून आयटीबीपीला नवीन बटालियन मिळण्याबाबत प्रकरण अडकलेले होते. मात्र ज्याप्रकारे भारत-सीमेवर सध्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये सरकार सुरक्षा दलाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. आयटीबीपीला आता लवकरच 7 बटालियन मिळेल. ज्यांना भारत-चीन सीमेवरील वेगवेगळ्या बीओपीवर तैनात केले जाईल.

7 बटालियन मिळाल्यानंतर एकूण 47 बीओपीवर जवानांना तैनात केले जाईल. यातील 39 बीओपी अरुणाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात आहेत. सोबतच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील बीओपीवर जवान तैनात केले जातील. बटालियनची संख्या वाढल्याने अतिरिक्त जवानांना सीमेवर तैनात केले जाईल.

भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्यासह आयटीबीपीचे जवान लडाख ते अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडपर्यंत तैनात आहेत. चीनी सैनिकांच्या या भागात हालचाली वाढल्या आहेत. अरुणाचल प्रदेशात आयटीबीपीची एका पोस्ट दुसर्‍या पोपासूनचे 100 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावार आहे. आहे. अशा परिस्थितीत चिनी सैनिकांच्या घुसखोरीची माहिती योग्य वेळी उपलब्ध नाही.