माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण


मुंबई – राज्याचे माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः खोत यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. सदाभाऊ खोत सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, धन्यवाद सदाभाऊ खोत

Posted by Sadabhau Khot on Tuesday, 25 August 2020

माझी कोवीड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मी आता उत्तम आहे, व मी क्वॉरनटाईन झालो आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटंबाची काळजी घ्या. गणेशरायाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळातही सदाभाऊ खोत हे सक्रियपणे काम करत होते. त्याचबरोबर सदाभाऊ सांगली येथे रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनताही सहभागी झाले होते. इस्लामपूर येथे जिल्हा कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते.