कंगना राणावतविरोधात देशद्रोहाची तक्रार, संविधानाचा अपमान केल्याचा आरोप

प्रत्येक मुद्यावर आपले मत मांडणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अभिनेत्रीच्या विरोधात गुरुग्राम येथे देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुग्राम सेक्टर 37 स्टेशनमध्ये ही तक्रार भीमसेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांच्याद्वारे दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यानुसार, कंगनाने ट्विट करत संविधानाचा अपमान केला आहे. या प्रकरणात कंगनाच्या विरोधात देशद्रोहाच्या गंभीर गुन्ह्याखाली एफआयआर दाखल होऊ शकते. यासंदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

सोशल मीडियावर देखील कंगना राणावत ट्रेंड करत आहे. आरक्षणासंबंधी टिप्पणी केल्याने BoycottKangana ट्विटर ट्रेंड करत आहे.

कंगनाने ट्विट केले होते की, मॉर्डन भारतीयांनी जाती व्यवस्थेचा अविस्कार केला आहे. छोट्या शहरातील लोकांना माहिती आहे की आता हे कायद्याद्वारे स्विकार्य नाही. काही लोकांसाठी हे दुसऱ्याला दुःख देऊन आनंद मिळविण्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. आरक्षणावर केवळ आपले संविधान कायम आहे. यावर चर्चा करू या.